पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदीच योग्य उमेदवार -जेठमलानी

January 29, 2013 10:16 AM0 commentsViews: 14

29 जानेवारी

नरेंद्र मोदी धर्मनिरपेक्ष नेते आहेत त्यामुळे पंतप्रधानपदासाठी मोदीच योग्य उमेदवार आहेत असं आता भाजपमधले बंडखोर नेते राम जेठमलानी यांनीही म्हटलं आहे. असं वक्तव्य करुन जेठमलानी यांनी यशवंत सिन्हांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. शिवाय भाजपनं मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावं अशी मागणीही जेठमलानी यांनी केली. त्याचबरोबर सी.पी. ठाकूर यांनीही मोदींचं समर्थन केलंय. लोकभावनेचा आदर करा मोदीचं नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर अशी मागणी बिहार भाजपचे अध्यक्ष सीपी ठाकूर यांनी केली आहे. भाजपमधल्या या अंतर्गत वादाला काल ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी तोंड फोडलं. भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

close