हार्बर लाईनची वाहतूक सुरळीत

March 5, 2013 11:50 AM0 commentsViews: 10

05 मार्च

मुंबई : कुर्ला स्थानकावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणार्‍या लोकलचा डब्बा हार्बर लाईनवर घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अखेर संध्याकाळी घसरलेला डबा काढण्यात रेल्वेच्या कर्मचार्‍यांना यश आलंय. वाहतूक आता पुर्वपदावर आली आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास वडाळा स्थानकाजवळ महिलांचा डबा अचानक रुळावरून घसरला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र ऐन संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे घरी परतणार्‍या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.

(संग्रहित छायाचित्र)

close