जुन्या टॅक्सीचं रजिस्ट्रेशन रद्द

December 5, 2008 3:05 PM0 commentsViews: 8

5 डिसेंबर मुंबईउदय जाधव25 वर्षांपेक्षा जुन्या टॅक्सी मुंबईत चालवू न देण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. या निर्णयाला आता हायकोर्टानेही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या यानिर्णयामुळे मुंबईतल्या 3500 टॅक्सीचं रजिस्ट्रेशन रद्द होणार आहे. त्यामुळे एकीकडे टॅक्सी ड्रायव्हरवर उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.मुंबई हायकोर्टाने 25 वर्षापूर्वीच्या टॅक्सीचं रजिस्ट्रेशन रद्द केलंय. आणि त्याला सराकरने पर्याय दिला आहे तो ओमनी टॅक्सी कॅबचा. पण टॅक्सी ड्रायव्हर, या ओमनी कॅब विकत घेऊ शकत नाही. कारण त्यांच्या किमती आहेत अडीच ते तीन लाख रुपये.

close