अखेर बारावीच्या पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे

March 13, 2013 12:31 PM0 commentsViews: 10

13 मार्च

मुंबई : – गेल्या 20 दिवसांपासून शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कार अखेर मागे घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेतला आहे. आज विधानसभेत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी एक निवेदन सादर केलं. यात शिक्षकांच्या तीन मागण्या मान्य केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात इतर मागण्यांवर निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही दर्डा यांनी दिलं. दर्डा यांच्या निवेदनानंतर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ज्युनिअर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतल्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संपातील हवा निघाल्याची चर्चा सुरू झालीय.

close