अबू जुंदाल विरोधात आरोपपत्र दाखल

February 7, 2013 12:35 PM0 commentsViews: 4

07 फेब्रुवारी

लष्कर ए तोयबाचा सदस्य असल्याचा संशयित आरोपी अबू जुंदाल यांच्या विरोधात नाशिक कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. नाशिकमध्ये घातपात घडवून आणण्याच्या संशयावरून लालबाबा बिलाल आणि हिमायत बेग यांना मुंबई एटीएसने अटक केली होती. या नियोजनात जुंदाल सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देवळालीचा मिलिटरी कॅम्प, पोलिस ट्रेनिंग अकादमी यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणींची बिलाल आणि बेगनं रेकी केली होती. त्यांच्यासोबत जुंदालचा सहभाग असल्याचं तसेच लष्करचा स्लीपिंग सेल तयार करण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि नेपाल या तीन देशांमध्ये जुंदाल काम करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

close