अल्प-अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 3 हजारांची मदत

January 15, 2013 2:48 PM0 commentsViews: 79

15 जानेवारी

राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसत आहे. या दुष्काळी भागातल्या अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 3 हजार रूपये मदत जाहीर करण्यात आलीय. पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी याबद्दल घोषणा केलीय. यानुसार 969 गाव आणि 3 हजार 569 वाडे दुष्काळग्रस्त यादी समाविष्ट करण्यात आले आहे. या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी 413.98 कोटींची तरतूद करण्यात आलीय. या गावात 410 चारा छावण्या बांधण्यात येणार असून चारा वितरणासाठी 684.29 कोटी वितरीत होणार आहे. तर गावकर्‍यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेत 18 हजार 960 कामं सुरू करण्यात येणार अशी माहितीही कदम यांनी दिली.

दुष्काळातल्या उपाययोजना

एकूण टँकर 1381 एकूण दुष्काळग्रस्त गावं 969, वाड्या 3569पाणीपुरवठ्यासाठी 413.98 कोटी वितरितएकूण 410 चारा छावण्या सुरूचारा वितरणासाठी 684.29 कोटी वितरितरोजगार हमी योजनेची 18,960 कामं सुरू

close