दुष्काळग्रस्त तालुक्यांना गावांचा मदतीचा हात

January 19, 2013 11:01 AM0 commentsViews: 44

19 जानेवारी

महाराष्ट्राचा काही भागाला दुष्काळाच्या झळांनी होरपळत असतांना सातारा जिल्ह्यातील फलटण, माण आणि खटाव तालुक्यात दुर्गम भागातील गावे पुढे सरसावली आहेत.जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त असले तरी दुसर्‍या भागात मात्र पाऊस चांगला झाला आहे. कुसुंबीमुरा आणि एकीव या गावांनी या डोंगर उतारावरील आणि आपल्या शेतातील गवत कापूने ते दुष्काळग्रस्त तालुक्यात पाठवत आहेत. हे गवत काढण्याचे काम जोमाने होण्यासाठी त्याबरोबर गवत कापणार्‍या लोकांच्या कामाचा शिन घालवण्यासाठी मागे वाद्य वाजवून अनोख्या पद्धतीने हे गवत काढले जात आहे. या पद्धतीला कामगत किंवा सौंदा सुद्धा म्हटले जाते. एकीकडे राज्य सरकार दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. मात्र त्या प्रत्येक तालुक्यात पोचताच यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. मात्र कुसुंबीमुरा आणि एकीव या गावांनी नवा आदर्श घालून दिला आहे.

close