ऑस्ट्रेलियाच्या टीममधून 4 खेळाडूंना डच्चू

March 11, 2013 10:05 AM0 commentsViews: 3

11 मार्च

भारत दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमसमोरच्या समस्या या वाढत चालल्या आहेत. 4 मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया 2-0 नं पिछाडीवर आहे आणि त्यातचं आता मोहालीमध्ये होणार्‍या तिसर्‍या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममधून 4 खेळाडूंना डच्चू देण्यात आला. व्हाईस कॅप्टन शेन वॉटसन, बॅट्समन उस्मान ख्वाजा आणि फास्ट बॉलर्स मिचेल जॉन्सन आणि जेम्स पॅटिन्सनला टीममधून वगळण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चारही खेळाडूंना टीम मॅनेजमेंटने तिसर्‍या टेस्टअगोदर त्यांच्या कामगिरीवर एक प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं होतं. पण या खेळाडूंनी ते प्रेझेंटेशन दिलं नाही. या चार खेळाडूंपैकी वॉटसन आणि पॅटिन्सन पहिल्या दोन टेस्टमध्ये खेळले होते. तर उस्मान ख्वाजा खराब फॉर्मात असलेल्या फिल ह्युजेसला बदली खेळाडू होता. पण आता तिसर्‍या टेस्ट अगोदर ऑस्ट्रेलियन बोर्डाने त्यांच्या खेळाडूंवर ही कडक कारवाई केली. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानची तिसरी टेस्ट मोहालीत 14 मार्चपासून सुरु होणार आहे.

close