सहकारी संस्थांना दिलासा, 97 व्या घटना दुरूस्तीला मान्यता

January 31, 2013 9:50 AM0 commentsViews: 35

31 जानेवारी

97 व्या घटना दुरूस्तीच्या अनुशंगान राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यात आला आहे. या नव्या सहकार कायद्यातील बदलांना राज्य मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीला बरखास्त होऊ शकलेल्या अडीच लाख सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकारी संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळाला कार्यकाळ पूर्ण करू देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच मान्यता संपलेल्या संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र सहकार निवडणूक आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कायद्यानुसार केंद्र सरकारने 21 सदस्यांच्या संचालक मंडळात ओबीसी आणि व्हि.जे, एन.टी.लाही आरक्षण दिलंय. पण कायद्यातल्या काही महत्वाच्या तरतुदीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी खडाजंगी झाली. विशेषत: अडचणीत आलेल्या पतसंस्था आणि साखर कारखान्यावर निर्बंध लावण्यास राष्ट्रावादीच्या मंत्र्यांनी विरोध केला. पतसंस्थाच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्याची तरतुदीवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यामुळे आज पुन्हा काही तरतुदींवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री चर्चा करणार आहेत.

close