दिल्ली गँगरेप: 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित

February 2, 2013 12:59 PM0 commentsViews: 51

02 फेब्रुवारी

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या सर्व 5 आरोपींविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोप निश्चित केले आहेत. सामूहिक बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप आरोपी राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश, विनय, पवन आणि अक्षय या पाच जणांविरुद्ध निश्चित करण्यात आले आहे. IPC नुसार सर्व आरोपींवर 13 वेगवेगळी कलमं लावण्यात आली आहेत. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी 5 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. सहावा आरोपी अल्पवयीन असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर ज्युवेनाईल कोर्टात खटला चालणार आहे. निश्चित केलेले आरोप

- कलम 302 – खून- कलम 376 – सामूहिक बलात्कार- कलम 377 – अनैसर्गिक संभोग- कलम 307 – खुनाचा प्रयत्न- कलम 365 – अपहरण- कलम 394 – गंभीर इजा करणं- कलम 395 – दरोडा- कलम 396 – दरोडा आणि खून – कलम 201 – पुरावे नष्ट करणं- कलम 120-ब – गुन्हेगारी कट

close