प्रक्षोभक भाषणप्रकरणी वरुण गांधी निर्दोष

March 5, 2013 1:08 PM0 commentsViews: 6

05 मार्च

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे खासदार वरुण गांधी यांना पिलिभीत प्रक्षोभक भाषण प्रकरणी निर्दोष ठरवण्यात आलं आहे. पिलिभीत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान उत्तर-प्रदेशमधल्या पिलिभीतमध्ये वरुण गांधींनी प्रक्षोभक भाषण केलं होतं. अल्पसंख्यांकांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. अखेर 2014 लोकसभा निवडणुकांपुर्वीच वरूण गांधींना क्लीन चिट मिळाल्यामुळे भाजपला दिला मिळाला आहे.

close