डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 52 वा महापरिनिर्वाण दिन

December 6, 2008 7:04 AM0 commentsViews: 27

6 डिसेंबर, मुंबई6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. या 52 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दादरमधल्या चैत्यभूमीवर मध्यरात्री बारा वाजता त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर धम्मवंदना झाली. बाबासाहेबांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर, बौद्ध भिक्खू आणि हजारो अनुयायी चैत्यभूमीवर आल होते. "बाबासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळं समाधान मिळतं", असं यावेळी त्यांच्या अनुयायांनी सांगितलं. अतिरेक्यांनी मंुबईवर केलेल्या हल्ल्यामुळे यावर्षी महापरिनिर्वाण दिनासाठी दर वर्षीसारखी गर्दी जमली नसल्याचं, बौद्ध भिक्खूंचं म्हणणं आहे.

close