बारावी सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

January 17, 2013 1:06 PM0 commentsViews: 138

17 जानेवारी

येऊ घातलेल्या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात थोडासा दिलासादायक बदल करण्यात आला आहे. सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. जीवशास्त्राचा पेपर 4 मार्चऐवजी 17 मार्चला घेण्यात येणार आहे. आणि रसायनशास्त्राचा पेपर 27 फेब्रुवारीऐवजी 26 मार्चला होणार आहे. बारावीचा सायन्स आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या धर्तीवर बदलण्यात आला आहे. त्यामुळे बारावीच्या अभ्यासक्रमातील बदलामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. सायन्स-गणित सारख्या अवघड विषयांसाठी 1 दिवसाचे अंतर चार ते पाच दिवस असावी अशी मागणी पालकांनी केली होती. पालकांच्या या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शिक्षणखात्याने हा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून परीक्षेच्या वेळपत्रकात बदल करण्यास पदाधिकार्‍यांनी नकार दर्शवला होता पण अखेर वेळपत्रकाचा 'पेपर' सुटला असून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

वेळापत्रकात बदलजीवशास्त्राचा पेपर 4 मार्चऐवजी 17 मार्चलारसायनशास्त्राचा पेपर 27 फेब्रुवारीऐवजी 26 मार्चला

close