पुण्यात 1 एप्रिलपासून LBT लागू

March 13, 2013 3:33 PM0 commentsViews: 53

13 मार्च

पुणे : येथील महानगरपालिका 1 एप्रिल 2013 पासून स्थानिक संस्था कर लागू करणार आहे. स्थानिक संस्था कर करिता व्यापार्‍यांच्या नोंदणीची सुरूवात उद्यापासून करण्यात येणार अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. पुण्यातील व्यापार्‍यांना एलबीटीची ऑन लाईन नोंदणी करता येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुद्धा नोंदणी करता येणार आहे. एलबीटी नोंदणी करिता महानगरपालिकेतील अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना दोन दिवसाच प्रशिक्षण देण्यात आलं आहे. एलबीटीमुळे महानगरपालिकेचे उतपन्न कमी होणार का याच भाकीत करता येणार नाही अस आयुक्तांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

close