‘विनयभंग प्रकरणी संजय दुबेला निलंबित करा’

January 15, 2013 3:25 PM0 commentsViews: 15

15 जानेवारी

पुण्यातील आयटी इंजिनियर तरूणीचा सोमवारी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. हा विनयभंग करणारा कॉग्निझंट कंपनीतील सहाय्यक ऑपरेशन मॅनेजर संजय दूबेला कंपनीतून निलंबित करा या मागणी करिता मंगळवारी कंपनी समोर युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आला. संजय दुबेची जेडंर जस्टीस खाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा युवा सेनेच्या कार्यकर्त्यानी केली. सोमवारी ही पीडित तरूणी मुलाखतीसाठी कॉग्निझंट कंपनीत आली होती. यावळी मॅनेजर संजय दूबेनं तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सदरील पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दुबे अटकेत आहे.

close