भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

January 19, 2013 12:46 PM0 commentsViews: 35

19 जानेवारी

भारत आणि इंग्लंड दरम्यान रांची येथे तिसर्‍या वन डेत भारतानं इंग्लंडचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव करत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली आहेत. या विजयाबरोबरच भारतानं पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतलीये. भारतीय बॉलर्सची दमदार कामगिरी आणि विराट कोहलीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 28 व्या ओव्हरमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली. कॅप्टनचा हा निर्णय भारतीय बॉलर्सनं सार्थ ठरवला. मॅचच्या आठव्या ओव्हरमध्ये शमी अहमदनं इंग्लंडचा कॅप्टन ऍलिस्टर कुकला आऊट करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. तर धोकादायक ठरणार्‍या केविन पीटरसनला ईशांत शर्मानं पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. यानंतर भुवनेश्‍वर कुमार, रविंद्र जडेजा आणि आर अश्विननं मधली फळी झटपट गुंडाळली. इंग्लंडची इनिंग फक्त 155 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना भारतचाही सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला शुन्यावर आऊट झाला. तर गौतम गंभीर 33 रन्सवर आऊट झाला. पण यानंतर विराट कोहलीनं झुंजार बॅटिंग करत विजयाचा मार्ग मोकळा केला. घरच्या मैदानावर खेळणार्‍या कॅप्टन धोणीनं विजयी चौकार लगावत विजय मिळवून दिला.

close