डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राण वाचवणार्‍या आजी

December 6, 2008 7:16 AM0 commentsViews: 689

6 डिसेंबर, बार्शीसिद्धार्थ गोदामडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलेले आणि त्यांच्यासोबत काम केलेले आता फारच थोडे लोक राहिलेत. बार्शीत एक जिगरबाज आजी आहेत, ज्यांनी 1941 साली बाबासाहेबांचे प्राण वाचविले होते. या आजींची ही कहाणी. कोंडाबाईंसाठी बाबासाहेब जीव की प्राण. 1941 साली बार्शीत बाबासाहेबांवर जबरदस्त दगडफेक झाली होती. त्यावेळी याच कोंडाबाईंनी जवळपास दोन तास काठी चालवून बाबासाहेबांचं रक्षण केलं होतं. ज्या काळात मुलींना शिकायला परवानगी नव्हती, त्या काळात कोंडाबाईंनी आत्मरक्षणाचे अनेक प्रकार शिकल्या. पतीनंही त्यांना ठाम पाठिंबा दिला. आणि त्याचाच कोंडाबाईंना उपयोग झाला. "माझ्या नवर्‍यानं मला आत्मरक्षणाचे अनेक प्रकार शिकवले. लाठी-काठी, पेटलेल्या टेंभ्याचं रिंगण, डोक्यावर नारळ फोडणे, काठी फिरवत फिरवत नारळाचा नेम धरणे हे सगळं मी शिकून घेतलं" कोंडाबाईंच्या लाठीकाठीचे प्रयोग आसपासच्या गावातही होत असत. डॉ. बाबासाहेब आबेडकर याना वैचारिक लढ्यात अनेक विरोध सहन करावे लागले प्रसंगी त्याच्यावर हल्ले करण्यात आले. 1941 साली याच ठिकाणी बाबासाहेबावर जबरदस्त दगडफेक करण्यात आली. याच जिगरबाज आजीने केवळ एका लाठीच्या सहाय्याने बाबासाहेबाच संरक्षण केले बाबासाहेबाच्या अंगावर एकही दगड पडू दिला नाही. कोंडाबाई आज 80 वषांर्च्या आहेत. वयोमानाने शरीर थकलं, मात्र बाबासाहेबांच्या आठवणीनं आजही त्यांच्या अंगात वीज संचारते.

close