मनसेनं उधळून लावली सेंट्रल बँकेची क्लार्क भरती

February 22, 2013 11:54 AM0 commentsViews: 49

22 फेब्रुवारी

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची नोकर भरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनाधिकार सेनेनं उधळून लावली. मुंबईत सेंट्रल बँकेच्या 407 जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होती. यावेळी मनसेच्या जनाधिकार सेनेचे अध्यक्ष शिरीश पारकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा सेंट्रल बँकेच्या मुख्यालयावर नेण्यात आला. या भरती प्रक्रियेत 80 टक्के उमेदवार अमराठी परप्रांतीय असल्याचा आरोप मनसेने केला आणि ही प्रक्रिया ताबडतोब रद्द करण्याची मागणी केली. यावेळी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापनातर्फे ही भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा भरती घेतली जाईल आणि महाराष्ट्रासाठी असलेली 407 पदं मराठी उमेदवारांनाच दिली जातील असं आश्वासन दिलं.

close