मराठवाडा कृषी विद्यापीठात रँगिंग, 7 जणांना अटक

February 2, 2013 1:04 PM0 commentsViews: 24

02 फेब्रुवारी

परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात रँगिंगचा प्रकार उघडकीला आला आहे. बी.एससीच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या 14 विद्यार्थ्यांची सिनियर्सकडून रँगिंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिसर्‍या वर्षाच्या 7 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 14 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या वसंत वसतीगृहात हा प्रकार घडला. या प्रकरणाची कुठे वाच्यता होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण पीडित विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर रँगिंगचा प्रकार समोर आला. ज्युनिअर विद्यार्थी सिनियर्स विद्यार्थांना मान देत नाही यावरून वाद झाला होता. त्यामुळे सिनियर्स विद्याथीर्ंनी पीडित 14 विद्यार्थांना बेल्टने मारहाण केली,त्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून 7 जण फरार झाले आहे.

close