रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात

January 29, 2013 10:45 AM0 commentsViews: 23

29 जानेवारी

देशाच्या विकासदराला चालना देणारा निर्णय आज रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. यात रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट बरोबरच सीआरआर (CRR)मध्ये कपात करण्यात आली आहे. हा दर 0.25 टक्के इतका कमी होणार आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर अतिरीक्त रोख रक्कम उपलब्ध होणार आहेत. याचाच परिणाम म्हणून सर्वसामान्याना मिळणार्‍या गृहकर्जाच्या व्याज दरात ही कपात होण्याची शक्यता आहे. याबरोबरच ह्या रक्कमेचा वापर सध्या मंदीच्या विळख्यात सापडलेल्या उत्पादन क्षेत्राला आधार देण्यासाठी सुध्दा होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करता आहेत.

close