काय महागलं ?

February 28, 2013 2:23 PM0 commentsViews: 72

28 फेब्रुवारी

केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी 2013-14 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात श्रीमंतांवर टॅक्स वाढवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात आला आहे. या संकल्पात सर्व एसी हॉटेलमध्ये भोजन करणे महागले आहे. त्याचपाठोपाठ महागड्या चारचाकी आणि दुचाकी गाड्यांवर 100 टक्के एक्साईज टॅक्स लावण्यात आला आहे. एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडत आहे तर आता चांदीही महागले आहे. मागिल वर्षी डिजिटल क्रांतीची घोषणा करत सेटटॉप बॉक्स लावणे बंधनकारक करण्यात आले. मागिल वर्षी सर्व प्रमुख शहरांमध्ये सेटटॉप बॉक्स मोहिम राबवण्यात आली. त्यामुळे ज्यांनी सेटटॉप बॉक्स लावले नाही अशांना आता फटका बसणार आहे. कारण या बजेटमध्ये सेटटॉप बॉक्स महागले आहे. त्याचबरोबर दूरसंचार सेवेनं गेल्या काही वर्षात उल्लेखनिय केलेली प्रगती पाहता मोबाईल फोनधारकांची संख्या दुपट्टीने वाढली आहे. मात्र फोनवर बोलणे स्वस्त जरी असले तरी स्मार्ट फोन घेणे आता महागले आहे. 2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महागणार आहे. तसंच 'ध्रुमपान सेहत के लिए हानिकारक होता है' असं सांगत सिगारेट,सिगार 18 टक्क्याने महागणार आहे. सिगारेट आता 1 रुपयांनी महागणार आहे.

हे महागलं

सर्व एसी हॉटेलमधले भोजन महागलेअलिशान मोटारींवर 100 टक्के एक्साईज टॅक्ससेटटॉप बॉक्स महागलेचांदी महाग2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महागसिगारेट 18 टक्क्यांनी महागणारइंपोर्टेड गाड्या आणि बाईक्स महाग – संगमरवर महागएसयूव्ही कार परदेशी बाईक महागरॉ सिल्क महाग

close