हेलिकॉप्टर घोटाळा : सीबीआयची टीम इटलीत दाखल

February 19, 2013 11:03 AM0 commentsViews: 53

19 फेब्रुवारी

हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआयची टीम इटलीत दाखल झाली आहे. या घोटाळ्याचा तपास करणार्‍या इटालियन अधिकार्‍यांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न ही टीम करणार आहे. पण या घोटाळ्याच्या तपास अहवालाची प्रत देण्यास तिथल्या कोर्टाने आधीच नकार दिला आहे. त्यामुळे इटलीतील एखाद्या वकिलाची नेमणूक करुन अधिकृतपणे ही माहिती मिळवता येईल का याचीही चाचपणी सीबीआयतर्फे केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हेलिकॉप्टर खरेदीला स्थगिती देण्याच्या संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांच्या निर्णयाबाबत आपण नाराज नाही असं सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले आहे. तर भाजप या मुद्यावर संसदेत तयार आहे, पण सरकार बहुमताच्या जोरावर हा भ्रष्टाचारही दाबून टाकेल असा दावा भाजपने केला आहे.

close