मुख्यमंत्र्यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता

December 6, 2008 7:30 AM0 commentsViews: 3

6 डिसेंबर, मुंबईमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा घोळ संपला असला तरी शपथविधीचा मुहूर्त अजून मिळाला नाही. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेऊन आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापण्याचं निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या मंत्र्यांची यादी अगोदरच तयार ठेवलीय. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी सात मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारीच करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं काँग्रेससमोर ठेवला होता. पण काँग्रेसची यादी तयार नसल्यानं शपथविधी लांबणीवर पडलाय. तो आता रविवारी किंवा सोमवारी होण्याची शक्यता चव्हाण यांनी बोलून दाखवलीय.

close