चंदगडमध्ये एव्हीएच कंपनीला गावकर्‍यांचा कडाडून विरोध

January 17, 2013 2:01 PM0 commentsViews: 71

17 जानेवारी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात होणार्‍या एव्हीएच कंपनीला कडाडून विरोध केला जातोय. या कंपनीनं प्रशासनालाच विकत घेतल्याचा आरोप माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळं प्रशासकीय पातळीवर खळबळ उडालीये. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि प्रादेशीक अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्या कटकारस्थानामुळं चंदगडच्या नैसर्गिक साधनसंपत्तीला हानी पोहोचणारा हा प्रकल्प मंजूर झाल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. या कंपनीमुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असल्याचा ग्रामस्थांचा तसंच तालुक्यातील नागरीकांचा आरोप आहे. कंपनीच्या विरोधात चंदगड तालुका जनआंदोलन कृती समितीची स्थापना करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या जागेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागून कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसानही झालं होतं. त्यामुळं या कंपनीविरोधातलं हे आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.

close