गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे दाभोळ प्रकल्प ठप्प

March 7, 2013 2:45 PM0 commentsViews: 16

07 मार्च

रत्नागिरी : दाभोळचा उर्जा प्रकल्प गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना पी चिदंबरम यांनी या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा गॅस कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र कृष्णा गोदावरी बेसिनमधून प्रकल्पाला होणारा गॅस पुरवठाच बंद झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या प्रकल्पातून एक मेगावॅटही वीज निर्माण झालेली नाही. त्यामुळे राज्यातल्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा लोडशेडिंग सुरू झालंय.

close