माजी राष्ट्रपतींच्या बंगल्याविरोधात आंदोलनाचा इशारा

March 13, 2013 3:37 PM0 commentsViews: 68

13 मार्च

पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या पुण्यात उभारल्या जात असलेल्या बंगल्याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा निवृत्त लष्कर अधिकारी सुरेश पाटील यांनी दिलाय. पुण्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी 'रायगड' या बगल्याचं पुर्न:बांधकाम करण्यात येतंय. पण नियम डावलून तरतूदी पेक्षा जास्त बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केलाय. नियमा नुसार राष्ट्रपतीच्या निवासाकरिता 4,498 स्कवेअर फूट जागा निवसाकरिता आणि एक हजार स्कवेअर फूट जागा सुरक्षा रक्षकाच्या तात्पुर्त्या कार्यालयाकरिता देण्यात येते. मात्र राष्ट्रपतींच्या बगल्यासाठी सहा हजार स्कवेअर फूट जागा वापरण्यात आली आहे. तसेच या बंगल्याच्या बांधकामावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहे. दरम्यान, वाढीव बांधकामासाठी संबंधीत मंत्रालयाकडून रिलॅक्सेशन देण्यात आलं असल्याच सांगण्यात आलं आहे. मात्र नियम डावलून या बंगल्याच बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप करत या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिलाय.

close