लैंगिक छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

February 9, 2013 3:50 PM0 commentsViews: 47

09 फेब्रुवारी

लातूर शहरातल्या परित्यक्त्या महिलांसाठी चालवल्या जाणार्‍या सबला महिला केंद्रातल्या एका महिलेनं लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी या महिलेने पोलीस अधीक्षकांच्या नावाने वेगवेगळी चार पत्रं लिहून ठेवली. यात केंद्र संचालक आणि कर्मचार्‍यांवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी संस्थेचे संचालकांसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलीस आणि काँग्रेस पक्षाच्या काही महिला पदाधिकारी या प्रकरणावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

close