‘यारी है इमान मेरा’ विना ‘जंजिर’चा रिमेक

January 19, 2013 1:52 PM0 commentsViews: 108

19 जानेवारी

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आणि प्राण यांच्या अजरामर जंजिर सिनेमाचा रिमेक येतोय. 'यारी है इमान मेरा' हे लोकप्रिय प्राणचं लोकप्रिय गाणं पुन्हा पाहायला मिळणार, असं वाटत असेल. पण या नव्या 'जंजिर'मध्ये यारी है इमान मेरा हे गाणं वगळलं गेलंय. दिग्दर्शक अपूर्व लाखियाला हे गाणं सिनेमात घ्यायचं होतं. पण एचएमव्ही (HMV) म्हणजे आताच्या सारेगामा कंपनीकडे या गाण्याचे हक्क आहेत. एका ट्रॅकसाठी कंपनीनं 40 लाखांची मागणी केलीये. किंवा सिनेमातल्या सगळ्या गाण्यांचे हक्क मागितले आहे. पण नव्या जंजिरच्या गाण्यांचे हक्क टी सीरिजकडे आहेत आणि या सगळ्या वादात प्रेक्षक मात्र चांगल्या गाण्याला मुकणार आहेत. नव्या जंजिरमध्ये संजय दत्त, प्रियांका चोप्रा आणि अमिताभच्या भूमिकेत रामचरण तेजा दिसणार आहे.

close