नागपूरमध्ये स्कुल बसचालकांचा संप,विद्यार्थ्यांचे हाल

February 5, 2013 11:30 AM0 commentsViews: 5

05 फेब्रुवारी

नागपूरच्या आरटीओ कार्यालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूलबस चालकांसाठी लावलेल्या नियमांच्या विरोधात स्कुल बसचालकांनी आज बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील काही शाळांना सुट्टी द्यावी लागली आहे. स्कूलबसचालक असोसिएशनने आरटीओ कार्यालयामध्ये सोमवारी निवेदन दिले. परिवहन विभागाच्या जीआरनुसार आरटीओने शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणार्‍या वाहनांत आवश्यक असणार्‍या सोयी सुविधासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. त्याला विरोध करत स्कुलबस असोसिएशनने विरोध केला आहे. 31 एप्रिलपर्यंत आरटीओने नव्या नियामांच्या अंमलबजावणीसाठी वेळ दिली आहे.

close