तारापूर अणुउर्जा प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात

December 6, 2008 7:50 AM0 commentsViews: 60

6 नोव्हेंबर, मुंबईदेशातील पहिल्या अणुउर्जा प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात आलीय. भोईसर जवळ असलेल्या तारापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या भोवती असेल्या भिंतींना तीस भगदाडं पडली आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हे भगदाडं पडलीयत, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील सर्वात जुन्या अणु उर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेचाची प्रश्न समोर आलाय. इतके दिवस अणुउर्जा विभागातर्फे याकडे का लक्ष देण्यात आलं नाही असा सवाल केला जातोय. तारापूर परिसरातील स्थानिक लोकांच्या जनावरं प्रकल्पाची भिंत ओलांडून चरण्यासाठी जात असल्याचंही बोललं जातंय.

close