महिला वर्ल्ड कप ट्राफीचं अनावरण

January 29, 2013 10:59 AM0 commentsViews: 9

29 जानेवारी

येत्या 31 जानेवारीपासून महिला क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. मुंबईत या वर्ल्ड कपच्या ट्राफीचं अनावरण करण्यात आलं. भारतीय महिला टीमची कॅप्टन मिथाली राज आणि गतविजेत्या इंग्लंडची महिली टीमची कॅप्टन चार्लोट एडवर्ड यांच्या हस्ते या कपचं अनावरण झालं. यावेळी वेस्टइंडिज आणि श्रीलंका टीमच्या कॅप्टनही उपस्थित होत्या. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवण्यात येणार असून सुपर सिक्स टीम पुढच्या फेरीत दाखल होतील. महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक जेतेपद पटकावली आहेत. तर भारताला केवळ एकदा फायनलपर्यंत पोहचता आलं आहे.

close