भाववाढ नियंत्रणासाठी कांद्याची निर्यातबंदी करा -शिला दीक्षित

February 2, 2013 1:10 PM0 commentsViews: 18

02 फेब्रुवारी

कांदा उत्पादन शेतकर्‍यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा निषेध केला आहे. कांद्यावर निर्यातबंदी लागू करण्याची मागणी दीक्षित यांनी केली होती. दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. नाशिकच्या घाऊक बाजारात सरासरी 15 रुपये क्विंटल या दरानं कांद्याची विक्री सुरू आहे. किरकोळ बाजारात मात्र कांद्याच्या किमती 35 रुपयांवर पोहोचल्या आहेत. या तफावतीचा शोध घेण्याऐवजी सरसकट निर्यातबंदी मागणं हे शेतकर्‍यांच्या हिताच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

close