डोण्ट वरी, देशव्यापी संपात मुंबई थांबणार नाही !

February 19, 2013 2:07 PM0 commentsViews: 23

19 फेब्रुवारी

कामगारांच्या मागण्यांसाठी डाव्या संघटनांबरोबरच शिवसेना रस्त्यावर उतरल्याने 21 आणि 22 फेब्रुवारी असे दोन दिवस पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'मध्ये मुंबईकरांची वाट सुकर झालीय. या संपात 34 कामगार संघटना सहभागी होणार आहेत. पण या संपाबाबत मुंबईकरांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. त्यातच गुरुवारपासून बारावीच्या परीक्षा सुरु होणार असल्यानं पालकही धास्तावले आहे. पण विद्यार्थ्यांना संपाचा त्रास होऊ नये याची काळजी कामगार संघटनांनी घेतली आहे. शरद राव यांच्या मजदूर युनियनने संपातून माघार घेत असल्याची आज घोषणा केली. महापालिका, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, आणि हॉस्पिटल प्रशासन संप होणार नाही, असं शरद राव यांनी स्पष्ट केलंय. फक्त औद्योगिक संपात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर टॅक्सीचालकही संपात सहभागी होणार नसल्याचं मुंबई टॅक्सीमेन युनियनचे अध्यक्ष ए एल क्वाड्रोस यांनी जाहीर केलंय. पण शिवसेनेची भारतीय कामगार संघटना संपात सक्रिय सहभागी होणार असल्यानं बससेवेवर परिणाम होऊ शकतो.

सुरू राहणार- रेल्वे, बसेस- टॅक्सी, रिक्षा- रुग्णालयं- अग्निशमन दल- पाणीपुरवठा- शाळा- अत्यावशक सेवा- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटबंद राहणार- देशातील सर्व सरकारी, खासगी बँका- एटीएम

close