डी. पी. शिर्केंवर आरोप निश्चित

March 5, 2013 2:30 PM0 commentsViews: 4

05 मार्च

जलसंपदा सचिव डी. पी. शिर्के यांच्याविरोधात जलसंपदा खात्याने आरोप निश्चित केले आहे. जलसंपदा खात्याने विभागीय चौकशीची चार्जशीट तयार केलीय. आणि ही चार्जशीट शिर्केंनाही देण्यात आली आहे. शिर्के विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांना शिर्के हेच जबाबदार असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असताना शिर्के यांना सिंचनाची श्वेतपत्रिका तयार करण्याचं काम सोपवण्यात आलं होतंं. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे श्वेतपत्रिकेची जबाबदारी काढून घेण्यात आली होती.

close