मुंबई हल्लाप्रकरणी दोघांना अटक

December 6, 2008 7:53 AM0 commentsViews: 3

6 डिसेंबरमुंबईवर दहशतवादी हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना कोलकात्यातून मोबाईल सिमकार्डस पुरवण्यात आल्याचं उघड झालं आहे. या संदर्भात कोलकाता पोलिसांनी तौसिफ रेहमान या संशयिताला अटक केलीय. अतिरेक्यांना सिमकार्ड उपलब्ध करुन दिल्याचा त्याच्यावर संशय आहे. काश्मीरमधून मुख्तार अहमद शेख यालाही याप्रकरणी अटक करण्यात आलीय. तौसिफ रेहमाननं दिलेल्या माहितीवरून मुख्तार शेखला अटक करण्यात आली आहे. तौसिफ रेहमान याने मुख्तार शेखला 22 सिम कार्ड दिले होते. तौसिफने अश्रफ नुमान या मृत व्यक्तीच्या नावाने सिम कार्ड घेण्यात आलं होतं. कोलकत्ता पोलिसांच्या माहितीनुसार एक सिमकार्ड मुंबई हल्ल्यासाठी वापरण्यात आले होते. मुख्तार हा श्रीनगरचा रहिवासी असून तो कोलकत्त्यात आटो रिक्शा चालवण्याच काम करायचा. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close