ऐरोली-ठाणे दरम्यान लोकलचे चार डब्बे घसरले

February 9, 2013 4:00 PM0 commentsViews: 28

09 फेब्रुवारी

ऐरोली-ठाणे दरम्यान आज दुपारी लोकलचे चार डबे घसरल्यानं ट्रान्स हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र ऐन संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर चाकरमान्यांचे हाल झाले. ट्रान्स हार्बरची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान, ऐरोली ठाणे मार्गावर बेस्ट आणि टीएमसीला जादा गाड्या चालवण्याची रेल्वे प्रशासनानं विनंती केली आहे.

close