‘क्वीन्स नेकलेस’च्या झगमटात शिवरायांचं स्मारक ?

January 19, 2013 3:01 PM0 commentsViews: 36

19 जानेवारी

मुंबईच्या वैभावाला 'चार चांद' लावणार्‍या क्वीन्स नेकलेसच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा विचार सरकार करत आहेत. क्वीन्स नेकलेसच्या मधोमध तीन खडकांची जागांबद्दल विचार सुरू आहे. त्यापैकी एक जागा निश्चित करण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. उच्चस्तरीय समितीकडून जागेची पाहणी झालीय. लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जागा निश्चित करतील असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. तसंच फ्लोराफाऊंटन ते हॉर्मिमन सर्कल परिसर कल्चरल झोन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. ठराविक काळात सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जाणार आहेत. त्यासाठी रस्ता आणि फूटपाथचं सौंदर्यीकरण करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा रचना आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलंय.

close