विठ्ठलाचे लाखो रुपयांचे दागिने गायब

January 22, 2013 2:22 PM0 commentsViews: 58

22 जानेवारी

गोरगरीबांचा देव म्हणून ओळखला जाणार्‍या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दागिन्यांच्या प्राचीन खजिना आहे. देवांचे सर्व अलंकार या खजिन्यात ठेवले जातात. या खजिन्यातील अलंकार गहाळ झाल्याचा अहवाल विधी आणि न्याय खात्याच्या तपासणी पथकानं दिलाय. जवळपास 88 हिरे, माणिक, मोती आणि सोन्याचे दागिने या खजिन्यातून गायब आहेत. एक वर्षापूर्वी दिलेला हा अहवाल मंदिर समितीनं गुडाळून ठेवला आहे. यात नेमकी काय गोम आहे, कोणाकोणाचा हाता आहे याचा शोध आता सुरू झालाय. मंदिर समितीचे नवीन अध्यक्ष अण्णा डांगे आता या प्रकरणाचा तपासासाठी पुढे सरसावले आहेत.

close