नागपूरमध्ये 10 हजार खाण कामगारांचा जीव धोक्यात

March 4, 2013 10:11 AM0 commentsViews: 2

04 मार्च

नागपूर आणि भंडार्‍यात 10 हजार कामगारांचे जीव धोक्यात आले आहे. मँगनीझ ओअर्स इंडिया लिमिटेड (मॉईल)च्या 9 खाणींमध्ये. कंत्राटी कामगारांसाठीच्या सुरक्षिततेचे सर्व नियम इथे धाब्यावर बसवण्यात आलेत. इथे कामगारांना हँडग्लोव्ज नाहीत, गम बुट नाहीत आणि हेल्मेटसुद्धा देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे इथे खाण कामगारांच्या सुरक्षिततेच्या कायद्यांचं उघड उल्लंघन होतंय. कामगारांना अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. अनेक कामगारांना गँगरीन झाले आहेत. पण त्याकडेही कंपनीनं साफ दुर्लक्ष केलंय. याविषयी आम्ही मॉईलच्या महाव्यवस्थापकांशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांनी बोलायला नकार दिला. पण एकीकडे कामगारांचे शोषण सुरू असताना मॉईल मात्र सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करतं आहे.

close