बेपत्ता संध्या सिंग यांचा मृत्यू

January 29, 2013 11:42 AM0 commentsViews: 18

29 जानेवारी

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या संगीतकार जतीन ललित यांची बहीण संध्या सिंग यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. नेरुळच्या एनआरआय कॉलनीच्या पाठीमागील खाडीच्या किनार्‍यावर एका महिलेचा सांगाडा सापडला होता. वैद्यकीय तपासणीनंतर हा सांगाडा संध्या सिंग यांचा असल्याचा स्पष्ट झालं आहे. एनआरआय कॉलनीत राहत असलेल्या संध्या 15 डिसेंबरपासून बेपत्ता होत्या. संध्या वीस लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने घेऊन घरातून निघाल्या होत्या. पण या दागिन्यांचा शोध अजून लागलेला नाही. संध्या ही अभिनेत्री सुलक्षणा पंडित, विजेता पंडित आणि संगीत दिग्दर्शक जतीन ललित यांची बहीण होती. संध्या यांचा शोध लागावा यासाठी संध्या यांचे पती जयप्रकाश सिंग यांनी पन्नास हजारांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.

close