अखेर ‘विश्वरूपम’चा वाद मिटला

February 2, 2013 3:58 PM0 commentsViews: 8

02 फेब्रुवारी

तामिळनाडूत विश्वरुपमच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. निर्माता कमल हासननं आज मुस्लीम संघटनांची भेट घेतली. आणि त्यांनी आक्षेप घेतलेल्या 7 सिन्सना कात्री लावण्याची तयारी दाखवली. काही आक्षेपार्ह संवादही म्यूट करण्यात येणार आहेत. कमल हासन आणि मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींची चेन्नईत तब्बल 5 तास चर्चा झाली. या चर्चेनंतर हा तोडगा निघाला. मी मुस्लिम बांधवाशी चर्चा केली. त्यांच्यापुढे माझं म्हणणं मांडलं. त्यांनीही त्यांची भूमिका मांडली. त्यांनी चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेतला ते संवाद म्यूट करण्याचा मी निर्णय घेतलाय. आता मला अपेक्षा आहे की लवकरच चित्रपटावरील बंदी मागे घेतली जाईल आणि चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती हासनने दिली. आता सरकारविरोधात मद्रास हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेण्याची घोषणा कमल हासननं केली. तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केल्याबद्दल त्यानी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे आभार मानले. आता तामिळनाडूत विश्वरुपमच्या रिलीजची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

close