फेब्रुवारी ‘फस्ट डे, फस्ट शो’ हाऊसफुल्ल

January 31, 2013 12:26 PM0 commentsViews: 8

31 जानेवारी

फेब्रुवारी सरू होतोय आणि नव्या महिन्यात सिनेरसिकांना भरपूर सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक कमल हसनच्या विश्वरूपमला मद्रास हायकोर्टाने अजूनही ग्रीन सिग्नल दिला नाही. पण हा सिनेमा शुक्रवारी मुंबईत रिलीज होतोय. हा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा आहे. सिनेमाचं दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती कमल हसनची असल्यानं रसिकांना नक्कीच चांगली ट्रीट मिळेल. तर 'माई' सिनेमातून पहिल्यांदा आशा भोसले सिनेमात मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबत पद्मिनी कोल्हापुरे आणि राम कपूर यांच्या भूमिका आहेत. आई-मुलीचं नातं अधोरेखित करणारा हा सिनेमा आहे. लिसन अमाया या सिनेमातून दीप्ती नवल आणि फारुख शेख यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नातेसंबंधांवर हा सिनेमा भाष्य करतो.तसंच बिजॉय नम्बियारचा 'डेव्हिड'ही पाहता येईल. डेव्हिड नावाच्या तीन माणसांची ही कथा आहे. याशिवाय दीपा मेहतांचा बहुचर्चित 'मिडनाइट चिल्ड्रेन' रिलीज होतोय. सलमान रश्दींच्या कादंबरीवर आधारीत असलेल्या सिनेमाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर मराठीत सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट'ही आपल्याला पाहता येईल. अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा प्रेमाची वेगळीच परिभाषा समोर आणतो.

close