‘पंतप्रधान होण्याची इच्छा नाही’

March 5, 2013 4:10 PM0 commentsViews: 10

05 मार्च

दिल्ली : 2014 चे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिलं जातंय. पण आपल्याला पंतप्रधानपदात रस नाही असं राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केलं. तसंच काँग्रेसमधली हायकमांड संस्कृती संपवण्याची गरज असल्याचं मतही राहुल गांधींनी मांडलं आहे. पक्ष आणि आघाडी मजबूत करण्यासाठी लोकांपर्यंत जाणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधींना अमेरिकेतल्या व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरममध्ये भाषण करण्यासाठी आमंत्रण मिळालं होतं पण त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना या परिषदेचे आमंत्रण मिळाले होते. ते सॅटेलाईटवरून भाषण करणार होते. पण तेथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विरोधामुळे आयोजकांनी मोदींचे भाषण रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज राहुल गांधींना भाषणासाठी आमंत्रण मिळालं, पण त्यांनी ते नाकारलं.

close