नारायण राणे काँग्रेसमधून निलंबित

December 6, 2008 8:23 AM0 commentsViews: 23

6 डिसेंबरनारायण राणे यांना काँग्रेसमधून 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जनार्दन द्विवेदी यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींवर कडक शब्दात टीका केली होती. यानंतर राणेंनी पक्षशिस्तीचा भंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अभिषेक मनू सिंघवी यांनी दिला होता. त्याप्रमाणे ही कारवाई केली गेली. अलिकडच्या काळात मार्गारेट अल्वांनंतर नारायण राणे हे अशा प्रकारची कारवाई होणारे काँग्रेसचे दुसरे मोठे नेते ठरले आहेत. 26/11 च्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता. यानंतर नारायण राणे मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक होते. मात्र या शर्यतीत अशोक चव्हाण यांनी बाजी मारली. त्यापूर्वीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेतृत्वावर ताशेरे ओढले. याचाच परिणाम म्हणून नारायण राणेंवर ही कारवाई करण्यात आलीय.

close