उद्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरी टेस्ट

March 13, 2013 4:52 PM0 commentsViews: 22

13 मार्च

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान उद्यापासून मोहालीत तिसर्‍या टेस्टला सुरुवात होतेय. पहिल्या दोन टेस्ट जिंकत भारताने सीरिजमध्ये 2-0 नं आघाडी घेतली आहे. तर 4 खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या समस्यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे मोहाली टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया टीम काय बदल करतेय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. शेवटच्या दोन टेस्टसाठी भारतीय टीममध्ये एकच मोठा अपेक्षित बदल केला गेला. खराब फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागला टीममधून डच्चू देण्यात आलाय. त्यामुळे मुरली विजयबरोबर टीमची ओपनिंग कोण करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनमध्ये या जागेसाठी चुरस आहे. तर पहिल्या दोन टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सची कामगिरी चांगली झाली. त्यामुळे मोहालीमध्येही या कामगिरीत सातत्य राखण्याचं आव्हान भारतीय टीमसमोर आहे. पहिल्या दोन टेस्ट जिंकल्यामुळे भारतीय टीमचं मनोबल उंचावलंय, त्यामुळे मोहाली टेस्ट जिंकत ही सीरिज खिशात घालण्यासाठी भारतीय टीम आता सज्ज झाली आहे.

close