रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण

February 25, 2013 2:31 PM0 commentsViews: 10

25 फेब्रुवारी

घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सेसना पेशंटच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडलीय. गोवंडीत दोन तरुणांचा अपघात झाल्यानंतर त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण केली. त्यामुळे राजावाडी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि नर्सेसनी कामबंद आंदोलन केलं आहे. जोपर्यंत दोषींना अटक केली जात नाही तोपर्यंत कामावर जाणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर डॉक्टर आणि नर्सेस पुन्हा कामावर दाखल झाल्या आहेत.

close