मरोळ पूल अपघाताची जबाबदारी एमएमआरडीएने झटकली

February 7, 2013 2:47 PM0 commentsViews: 6

07 फेब्रुवारी

मंुबई सहार एअरपोर्टजवळ बुधवारी झालेल्या अपघाताची जबाबदारी एमएमआरडीएने झटकली आहे. पुलाच्या बांधकामाशी एमएमआरडीएचा संबंध नाही. पुलाचं बांधकाम हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत येतं. आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला थेट जोडणारा हा पूल आहे. बुधवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. ज्यात तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झालेत. जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारच्या नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असं एमएमआरडीए आणि कंत्राटदार कंपनी एल अँड टी ने स्पष्ट केलं आहे.

close