रब्बी पिकांना अहवालानंतर आर्थिक मदत -शरद पवार

January 19, 2013 3:11 PM0 commentsViews: 7

19 जानेवारी

राज्यात खरीप पिकांप्रमाणं रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालंय. त्याच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक येईल आणि त्यानंतर त्याबाबत राज्याला मदत देण्याचा विचार करू असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलंय. यापूर्वी खरीप पिकांच्या नुकसानीसाठी केंद्रानं 778 कोटी रुपयांची मदत केली होती. आता दुष्काळी भागातल्या रब्बी पिकांची पाहणी केंद्राच्या पथकाकडून केली जाईल. त्यानंतर त्यांचा अहवाल आला की, महाराष्ट्र आणि कर्नाटकला आर्थिक मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती शरद पवार यांनी सांगितलीय.

close