चीनकडून पाकिस्तानची पाठराखण

December 6, 2008 9:36 AM0 commentsViews: 1

6 डिसेंबरचीननं पुन्हा एकदा पाकिस्तानची पाठराखण केलीय.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आपला सूचक पाठिंबा दिलाय. सीमेपलिकडच्या दहशतवादाबद्दल बोलताना आपण कोणत्याही एका धर्माला टार्गेट करता कामा नये. कुठलाही आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करणं गरजेचं आहे असं चीनच्या लष्करातले सीनिअर कर्नल ह्युअँग स्यू पिंग यांनी म्हटलंय. "आम्ही नेहमीच सांगत आलोय की सीमापार दहशतवादाबद्दल बोलतांना आपण एका धर्माला किंवा पंथाला टार्गेट करता कामा नये.कुठलीही कारवाई करण्यापूर्वी आपल्याकडे मजबूत पुरावे असणं आवश्यक आहे" असं ते म्हणाले.

close