‘स्वबळावर लढूया’ खासदारांची राहुल गांधींकडे मागणी

March 11, 2013 12:14 PM0 commentsViews: 6

11 मार्च

दिल्ली :येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीशी फारकत घेऊन स्वबळा निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधींकडे केली आहे. राहुल यांनी दुपारी राज्यातल्या सर्व काँग्रेस खासदारांची बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या खासदारांनी निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेण्याचा आग्रह धरला. गुरुदास कामत, विलासराव मुत्तेमवार, मुरली देवरा, रजनी पाटील हे खासदार त्यासाठी आग्रही होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आपली साथ सोडणार आहे असं या खासदारांचं म्हणणं होतं. तसंच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी लवकर जाहीर करावी पक्ष संघटनेतली सर्व रिकामी पदं भरावीत महामंडळांचे सदस्य आणि अध्यक्षांच्या नियुक्त्या कराव्यात आणि राज्यात मंत्रिमंडळातली 5 मंत्रिपदं भरावीत अशा इतर मागण्याही राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी केल्याच कळतंय.

close